डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिला येत्या २९ ऑगस्टपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा खेडकर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होईल, असा न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं.

 

दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी यूपीएससीनं सादर केलेला जबाब आपल्याला कालच मिळाला आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी पूजा खेडकर हिच्या वकीलांनी केली. त्यानंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी २९ ऑगस्टला होईल असे आदेश दिले.तसंच पूजा खेडकर हिला २९ ऑगस्टपर्यंत अटक करू नये असंही सांगितलं.