नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणातील खटल्याला स्थगिती देण्याची लालू यादव यांची याचिका फेटाळली

सी बी आय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या घोटाळ्यात दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वे मंत्री पदावर असताना यादव यांनी रेल्वेत नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत त्याबदल्यात काहीजणांकडून जमिनीचे तुकडे आपल्या कुटुंबियांच्या तसंच नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून यादव यांच्याविरीधात खटला दाखल करण्यात आला होता.