डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिल्लीतल्या शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्यांसाठी ९०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर

दिल्ली सरकारनं दिल्लीतल्या शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्यांसाठी 900 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर केली आहे. तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यालाही मंजुरी दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी यावेळी डिजिटल वर्गखोल्यांच्या विस्तारीकरणाची योजना जाहीर केली. मंत्रिमंडळानं 9 वी ते 12 वीच्या वर्गांसाठी 18 हजार 966 अतिरिक्त स्मार्ट वर्गखोल्या तयार करण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानं 2029-30 पर्यंत स्मार्ट वर्गखोल्यांची एकंदर संख्या 21 हजार पेक्षा जास्त होईल.

 

राष्ट्रीय राजधानी विकसित, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी महत्वाच्या निर्णयांवर यावेळी चर्चा झालयाची माहिती कॅबिनेट मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली. हे केवळ धोरणांचं मूल्यमापन नसून, विकसित भारत- विकसित दिल्ली हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं उचललेलं पाऊल असल्याचं ते म्हणाले.