दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपी उमर उन नबी याला आश्रय देणाऱ्या फरीदाबादमधल्या एका रहिवाशाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज अटक केली. त्याचं नाव सोयब असून या प्रकरणात अटक झालेला तो सातवा आरोपी असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितलं. सोयब उमर उन नबी याला रसद पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा उलगडा होण्याच्या दृष्टीने सोयबची कसून चौकशी सुरू असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितलं.
Site Admin | November 26, 2025 3:33 PM
दिल्ली स्फोट प्रकरणातल्या सातव्या आरोपीला अटक