दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी झालेल्या स्फोटप्रकरणातले नवे धागेदोरे समोर आले आहेत. या स्फोटात वापरलेली गाडी डॉ. उमर मोहम्मद नबी चालवत असून तोच या घटनेतील संशयित असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे.
संशयित आरोपी उमर हा जम्मू काश्मिरच्या पुलवामा इथला रहिवासी असून तो फरीदाबाद इथल्या अल फलाह विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.