दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक

पुढच्या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठीची निवडणूक आयोगाची बैठक सध्या सुरू आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी, तसंच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या बैठकीत चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही आयोग आज संवाद साधणार आहे. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षानं सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसनं २१ जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने अद्याप एकही उमेदवार दिलेला नाही.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.