डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 18, 2024 8:21 PM | Delhi Air Quality

printer

दिल्लीत जीआरएपी प्रकारचे निर्बंध लागू करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हवेची गुणवत्ता अतिगंभीर पातळीपर्यंत घसरल्याने दिल्ली एनसीआर परिसरात जीआरएपी प्रकारचे निर्बंध लागू करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती अभय ओक आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी आज झाली. दिल्ली आणि लगतच्या राज्यांना बारावीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग प्रत्यक्षरित्या न घेता ऑनलाईन तत्वावर सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीत फटाक्यांवर बंदी असल्याने त्याची अंमलबजावणी कशी केली याबाबत दिल्ली सरकार आणि पोलीस आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.