विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरो मध्ये दाखल झालं.
भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे.