भारत प्रथमच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. उत्तराखंडमधल्या देहरादून इथं येत्या २० ते २३ ऑगस्ट दरम्यान आशियाई खुल्या शॉर्ट ट्रॅक जलद स्केटिंग चषक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.
महाराणा प्रताप क्रीडा महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेत ११ हून अधिक आशियाई देश सहभागी होणार आहेत, अशी माहिती आइस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी दिली आहे.
या देशांमध्ये भारतासह चीन, जपान, हाँगकाँग, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड,चिनी तैपेई, व्हिएतनाम,मलेशिया, फिलीपिन्स या देशांचा समावेश आहे.
स्पर्धेत ९ वेगवेगळ्या प्रकारात स्पर्धक आपलं कौशल्य दाखवतील.