डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्यापासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्यापासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्याबरोबर २१व्या भारत रशिया सरकारस्तरावरील चर्चेत सहभागी होणार असून यावेळी त्यांच्यात संरक्षण आणि संरक्षण उद्योग यातल्या सहकार्यावर चर्चा होणार आहे. राजनाथ सिंह सोमवारी लेनिनग्राड इथं भारतीय नौसेनेच्या क्षेपणास्त्रधारी आयएनएस तुशील या युद्धनौकेचं कमिशन करतील. यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठीही उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात संरक्षण मंत्री रशियातल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत.