संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान अशी निराधार आणि दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं हे लज्जास्पद असून देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारं आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भारतात शिख समुुदायाला त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाचं पालन करू दिलं जात नाही या गांधी यांचा आरोप तथ्यहीन आणि सत्यापासून कोसो दूर असल्याचंही सिंह म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.