संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासावर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत संरक्षण लेखा विभाग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पासाठी लेखा विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, असं ते यावेळी म्हणाले. निवृत्ती वेतन तसंच कल्याणकारी योजनांमध्ये तसंच, संसाधनांचा योग्य वापर आणि युद्धकाळातली तयारी यासाठी सुद्धा लेखा विभागाचं कार्य महत्त्वाचं असल्याचं सिंह म्हणाले.
Site Admin | October 1, 2025 2:54 PM | Defense Minister Rajnath Singh
तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी-राजनाथ सिंह
