भारताचे नेहमीच आपल्या शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध-राजनाथ सिंह

भारतानं नेहमीच आपल्या शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत आणि बांगलादेश यास अपवाद नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत  होते. ‘मित्र बदलता येऊ शकतील, पण शेजारी नाही’ या माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींच्या विधानाची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.