नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोकराज सिग्देल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट

नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोकराज सिग्देल यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही देशांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. नेपाळच्या लष्कराची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह संरक्षण सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शेजारी प्रथम या भारताच्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्या शेजारी राष्ट्राशी संबंध दृढ करण्याच्या भारताच्या इच्छेचा त्यांनी पुनरुच्चार केला.