डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी भारत सकारात्मक – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच सकारात्मक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. लाओसमध्ये व्हिएन्तियान इथं अकराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सीमा वाद ते व्यापार करार, यात घेतलेल्या भूमिकांमधून भारताची खुला संवादाबाबतची वचनबद्धता दिसून येते असं ते म्हणाले.