डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात काल संरक्षण गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 94 विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 31 जणांना परम विशिष्ट सेवा पदकं, 4 जणांना उत्तम युद्ध सेवा पदकं, 57 जणांना अति विशिष्ट सेवा पदकं तर दोघांना पुन्हा एकदा अतिविशिष्ट सेवा पदकं बहाल करण्यात आली. या समारंभाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.