डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारताचं लक्ष्य २०४७ पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल – वायुसेनाप्रमुख ए. पी. सिंग

देशाच्या संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तम दर्जाच स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता विकसित करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन वायुसेनाप्रमुख ए पी सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘अवकाशक्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर आयोजित २१व्या सुब्रोतो मुखर्जी परिषदेचं उदघाटन करताना ते आज बोलत होते. विकसित भारताचं लक्ष्य २०४७ पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल आणि त्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.