भारतात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग मोठ्या विस्ताराच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी काल केलं. नवी दिल्लीत झालेल्या संरक्षण परिषदेत ते बोलत होते. सैन्य हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि युद्धासाठी सज्ज राहावं, तसंच, या सैन्याला आधुनिक पद्धतीच्या युद्धातली गुंतागुंत प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही सिंह यावेळी म्हणाले. मात्र, देशाला युद्धासाठी उपयुक्त असलेल्या प्रगत उत्पादनांचं केंद्र बनवण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात भागीदारी गरजेची असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
Site Admin | February 18, 2025 1:12 PM | Defense
भारतात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग मोठ्या विस्ताराच्या उंबरठ्यावर – संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह
