डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद होत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.