डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि टेनेसी मधल्या मेम्फिस इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौऱ्याचा  काल शेवटचा दिवस होता. मेम्फिस, अटलांटा आणि नॅशव्हिल इथल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना सिंग यांनी भारतीय समुदायाच्या समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या योगदानाचं कौतुक केलं. हे राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालय १७ व्या शतकातलं अमेरिकेच्या नागरी हक्क चळवळीचा इतिहास सांगणारं असून या ठिकाणी महात्मा गांधींचा एक अर्धपुतळा सुद्धा आहे.