तरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते आज गुजरातमधे भुज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते. नाणेनिधीनं दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूर मधल्या वायुसेनेच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली.
पाकिस्तानशी केलेली शस्त्रसंधी म्हणजे लष्करी कारवाईला पूर्णविराम नसून केवळ अल्पविराम आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर जसं पोलीस लक्ष ठेवून असतात त्याप्रमाणे आम्ही पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहोत, आणि पाकिस्ताननं पुन्हा काही आगळीक केली तर त्यांना आपलं सैन्यदल धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला.