डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रशियात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस तुशील भारतीय नौदलात दाखल

बहुउद्देशीय क्षेपणास्त्रवाहू जहाज आय एन एस तुशील चा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. रशियाच्या यंतार बंदरात झालेल्या या समारंभात भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. आय एन एस तुशील, ब्राम्होससह अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असून अतिदूरच्या सागरात जगभरात कुठेही कार्यरत राहू शकतं. या जहाजाच्या बांधणीत भारत आणि रशिया या दोन्ही देशातील तंत्रज्ञांचा हातभार लागला असून हे जहाज दोन्ही देशांच्या दीर्घ मैत्रीच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा दर्शवत असल्याचं यावेळी राजनाथ सिंग यांनी सांगितलं. या समारंभात दोन्ही देशांमधले महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.