संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची घेतली भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लाओसमध्ये व्हिएन्तियान इथे जपानचे संरक्षण मंत्री जनरल निकातानी यांची भेट घेतली. निकातानी यांच्यासोबत या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो-पॅसिफिक प्रदेशातल्या मुक्त भागिदारीविषयी चर्चा झाल्याचं सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. त्यानंतर सिंग यांनी फिलिपीनचे संरक्षण सचिव गिल्बर्टो टिओडोरो यांचीही भेट घेतली. ॲक्ट ईस्ट धोरण आणि इंडो पॅसिफिक व्हिजन या योजनांमधला फिलीपीन हा महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे फिलीपीनसोबत संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं.