संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळी गुजरातमधल्या भुजला रवाना झाले. या भेटीत ते भुज हवाई दल स्थानकावर हवाई दलाच्या जवानाशी संवाद साधतील. तसंच २००१ च्या भुज भूकंपात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मृतिवनालाही राजनाथ सिंह भेट देणार आहेत.
राजनाथ सिंह भारत-पाकिस्तान सीमा प्रदेशालाही भेट देणार आहेत. यावेळी ते भारतीय लष्कराच्या कारवाई करण्याच्या तयारीचं परीक्षण करतील. भारत-पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्तानं भुज वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संरक्षण मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.