हायब्रीड वॉरफेअर, सायबर आणि अंतराळावर आधारित अडथळे सुरक्षा यंत्रणेसमोर आव्हान – संरक्षण मंत्री

हायब्रीड वॉरफेअर, सायबर आणि अंतराळावर आधारित अडथळे यासारख्या धोक्यांमुळे सुरक्षा यंत्रणेसमोर आव्हानं निर्माण होत आहेत असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज अंतर्गत सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञान या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना या संस्थेनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या आधुनिकीकरणासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केलं असल्याचं ते म्हणाले.