डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर अपूर्ण-राजनाथ सिंग

पाकिस्ताननं दहशवादाला पाठबळ देण कायम ठेवलं असून, पाकव्याप्त कश्मीरची भूमी दहशतवादासाठी वापरली जात आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू कश्मीरमधे अखनूर इथं माजी सैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. पाकिस्ताननं आपले वाईट हेतू सोडून दिले पाहिजेत, असं ते म्हणाले. 

 

पाकव्याप्त कश्मीरशिवाय जम्मू कश्मीर अपूर्ण आहे. भारतासाठी पाकव्याप्त कश्मीर हा मुकुटमणी आहे, तर पाकिस्तानसाठी तो केवळ दुसऱ्या देशाचा तुकडा आहे. तिथल्या जनतेनं पाकिस्तानला कायम नाकारलं आहे. तिथं धर्माच्या आधारावर भेदभाव केला जातो, दहशतवाद्याच्या प्रशिक्षणाचे तळ चालवले जातात, त्यावर भारत योग्यवेळी पावलं उचलेल, असं ते म्हणाले. 

 

यावेळी राजनाथ सिंग यांनी १०८ फूटाचा राष्ट्रध्वज फडकावला तसंच अखनूर इथं वारसासंग्रहालयाचं उद्धाटनही केलं.