संरक्षणमंत्री राजनाथ सिंग १२व्या आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग येत्या शनिवारी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी मलेशियाच्या क्वालालंपूर इथं १२ व्या ए डी एम एम प्लस म्हणजेच आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत  ते आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेच्या १५ वर्षांच्या प्रवासाचं  प्रतिबिंब आणि पुढील वाटचाल’ या विषयावर विचार व्यक्त करतील. या दोन दिवसीय या दौऱ्यात राजनाथ सिंग सहभागी देशांच्या संरक्षणमंत्र्यांसोबत तसेच मलेशियाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत  द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. २०२४ ते २०२७ या कालावधीत भारत आणि मलेशिया एकत्रितपणे दहशतवादविरोधी तज्ज्ञ कार्यगटाचे  संयुक्त अध्यक्ष  आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.