भारताची संरक्षण निर्यात २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती

भारताची संरक्षण निर्यात आता २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या एसआयडीएम वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन १ लाख ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं  आहे. नाविन्य, संरचना आणि उत्पादन अशा तिन्ही बाबींवर भर दिल्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. स्वदेश निर्मित शस्त्रांस्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचंही सिंग यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.