संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता ही घोषणा आणि धोरणांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं संरक्षण नवोन्मेष संवाद कार्यक्रमात बोलत होते. आजच्या काळात युद्धामधे तंत्रज्ञानाचा वापर अधिक होत असून या बदललेल्या परिस्थितीची सरकारला जाणीव असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत सरकारने गेल्या दहा वर्षांत देशात संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | October 7, 2025 2:30 PM | Defence Minister Rajnath Singh
संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता कृतीमधे परावर्तीत झाली असून त्याचा व्यापक परिणाम झाला आहे-संरक्षणमंत्री