संरक्षणमंत्री येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या भेटीमध्ये तीन करार होण्याची अपेक्षा असून, ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्र आणि संयुक्त उपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत होण्याची अपेक्षा असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.