September 29, 2025 1:19 PM

printer

देशाच्या सुरक्षेला अनेक आव्हानांसाठी सज्ज राहणं आवश्यक – संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

देशाच्या सुरक्षेला बाहेरुन आणि अंतर्गत भागातून निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज राहणं आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद नवी दिल्लीत होत आहे, तिथे आज ते बोलत होते. वेगवेगळ्या  पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे सुरक्षेला धोका उद्भवू शकतो या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांनी तयार राहिलं पाहिजे असं ते म्हणाले. युद्धभूमीवरच्या प्रत्यक्ष लढाईपेक्षा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून लढल्या जाणाऱ्या युद्धाला आता महत्त्व आलं असून त्यामुळे एकात्मिक स्वयंचलित प्रतिकार यंत्रणा उभारली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.