डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आर्थिक वर्ष २०२४-२५ मधे देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर

आर्थिक वर्ष २०२४-२५ मधे देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादनवाढ १८ टक्के जास्त आहे. यासाठी संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि इतर संबंधितांची प्रशंसा केली.