ऑपरेशन सिंदूरमुळे स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली-संरक्षण मंत्री

ऑपरेशन सिंदूर दरम्यान शौर्य आणि स्वदेशात निर्मित उपकरणांच्या क्षमतांचं प्रदर्शन यामुळे आपल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रकांच्या परिषदेत बोलत होते. जग भारताच्या संरक्षण क्षेत्राकडे नव्या आदराने पाहत असल्याचं ते म्हणाले. आजवर आयात केली जाणारी बहुतांश संरक्षण उपकरणं आता स्वदेशात तयार केली जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाचं श्रेय प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीला जातं, असंही ते म्हणाले. भारतातल्या संरक्षण उद्योगांनी जागतिक मागणीतल्या बदलांसाठी सज्ज राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.