नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नवी दिल्ली इथं करणार आहेत. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालय आणि राज्यं तसंच केंद्रशासीत प्रदेश यांच्यात समन्वय साधणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. याप्रसंगी संरक्षण मंत्री एक्जिम पोर्टलचं उद्घाटन करतील. देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोणती धोरणं आखायला हवीत यावर या परिषदेत विविध राज्यांच्या उद्योग विभागातील अधिकारी एकत्र चर्चा करतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.