डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

लष्कराच्या चिलखती वाहनांसाठी Advanced Land Navigation System खरेदीसाठी मंजुरी

संरक्षण खरेदी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत लष्कराच्या चिलखती वाहनांसाठी Advanced Land Navigation System खरेदी करायला प्राथमिक मंजुरी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तटरक्षक दलासाठी २२ बोटी खरेदी करायलाही परिषदेनं प्राथमिक मंजुरी दिली.

 

दरम्यान, संरक्षण मंत्रालयानं आज राष्ट्रीय शेअर बाजारासोबत सामंजस्य करार केला. सूक्ष्म, लघू, मध्यम कंपन्यांना NSE च्या या कंपन्यांसाठीच्या विशेष व्यासपीठाद्वारे निधी उभारता येतो. संरक्षण मंत्रालयासोबत काम करणाऱ्या अशा कंपन्यांमध्ये या व्यासपीठाद्वारे निधी उभारण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.