डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठवाड्यात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगासाठी २० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा देण्यात येईल, तसंच त्यांच्या स्वयंरोजगारांसाठी विविध योजना राबवण्यात येतील.