डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवर १३ ऑगस्टला निर्णय

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, क्रीडा लवादाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. एकसदस्यीय लवाद, डॉ. ॲनाबेले बेनेट, यांना निकाल देण्यासाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विनेश फोगटने लवादाकडे केलेल्या अर्जात संयुक्त रौप्य पदकाची विनंती केली आहे. 50 किलोग्रॅम प्रकारात उपांत्य फेरीत जिंकल्यानंतर विनेशचं वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याचं आढळून आलं होतं.