माजी केंद्रीय मंत्री देबेंद्र प्रधान यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील होते. देबेंद्र प्रधान यांनी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय दळणवळण तसंच कृषी मंत्री म्हणून काम केलं होतं. देबेंद्र प्रधान यांनी ओदिशातल्या भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपदही भूषवले होते.
देबेंद्र प्रधान यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आदरांजली वाहिली. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, विरोधी पक्ष नेते नवीन पटनाईक यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून देबेंद्र प्रधान यांना आदरांजली वाहिली आहे.