लोकसभेत आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा

लोकसभेत आज आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होईल. गोव्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातींचं प्रतिनिधीत्व सुधारण्याबाबतचं विधेयकही सादर होणं अपेक्षित आहे. राज्यसभेत तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक सादर होणार असून कृषी मंत्रालयाच्या कामकाजाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.