डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर

म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. २८ मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत ९८ भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशास्त्र आणि जलविज्ञान विभागानं म्हटलं आहे. यामध्ये सागाइंग, मंडाले आणि मॅगवे या प्रमुख शहरांमधल्या ८० टक्क्यांहून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन ब्रह्मासह युरोपीय राष्ट्र, अमेरिका, संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संघटनांनी म्यानमामध्ये मदत आणि बचाव पथकं पाठवली आहेत.