डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या बळींची संख्या ४५

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटीमुळे किमान ४५ जणांचा मृत्यू झाला असून यात सीआयएसएफचे दोन कर्मचारी आणि मछैल माता यात्रेसाठी आलेल्या अनेकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत वाचवण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त जणांपैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. असंख्य नागरिक अद्याप बेपत्ता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, लष्कर आणि स्थानिकांच्या मदतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली.