January 1, 2026 8:15 PM

printer

नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती

नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्वित्झर्लंडमध्ये एका बारला लागलेल्या आगीत मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे. या दुर्घटनेत सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर आहे.

 

मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आत्ताच नक्की आकडा सांगता येणार नाही, असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, हा कोणताही हल्ला नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.