डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची १६ पदकांची कमाई

टोक्यो इथं झालेल्या डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं यंदा १६ पदकांची चमकदार कामगिरी केली. यात ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. १० दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकंदर ३९ पदकांपैकी १६ पदकं भारतानं पटकावली. रायफल नेमबाज महित संधू हिनं २ सुवर्ण आणि २ रौप्यपदकांवर नाव कोरलं. तर पिस्तूल नेमबाज अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं. इतर नेमबाजांनीही उत्तम कामगिरी करत भारताला पदकांची कमाई करून दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.