दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्षे आज पूर्ण होत आहेत. १५ सप्टेंबर १९५९ रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली. आज, दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे, ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समीटरचे विस्तृत नेटवर्क आहे. देशभरातील सर्व शहरं आणि प्रादेशिक क्षेत्रं तसच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत दूरदर्शन पोहोचलं असून आता मोबाइल अपच्या माध्यमातूनही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे.
Site Admin | September 15, 2025 3:17 PM
दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्षे आज पूर्ण
