श्री संत नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज, पंढरपूर यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. संत नामदेव महाराज यांच्या ६७५व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येत्या गुरुवारी २४ जुलै रोजी पंढरपुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी संपूर्ण राज्यभरातले संतांचे वंशज, फड परंपरेचे प्रमुख, वारकरी संप्रदायातले मान्यवर, तसंच कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | July 20, 2025 3:14 PM | DCM Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर
