डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘स्मार्ट बस’मध्ये बसवलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथं  केली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे, त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसगाड्यांमधे लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसगाड्या प्रवासाकरिता अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  यावेळी व्यक्त केला. 

 

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा