उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान

भारतातल्या १४ भाषांमध्ये संत साहित्य पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूर इथं केशवराज मंदिरात शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. नाथ संप्रदायातले प्रमुख कीर्तनकार यावेळी  मोठ्या संख्येनं उपस्थित होते.