डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 25, 2024 2:54 PM | DCM Devendra Fadnavis

printer

माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन

माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असून यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत झाला, त्यावेळी फडणवीस बोलत होते. माथाडी कामगारांना घर मिळण्यासाठी पुढाकार घेऊ, महामंडळाचा नामविस्तार मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ  असा करू असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. माथाडी कामगारांच्या हिताचे नसलेले प्रस्ताव सरकारने नाकारले असून राहिलेल्या अडचणीही लवकरच सोडवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.