सर्पदंशावर हाफकिन संस्थेनं तयार केलेली लस प्रभावी आणि परिणामकारक असून यध्या हाफकिनकडे या लशीच्या दीड लाख मात्रा तयार आहेत, त्यांची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
केंद्र सरकारकडून पोलिओ लशीच्या २६ कोटी ८० लाख मात्रांची मागणी आहे. या लशीची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकारातून २५ कोटी रुपयांचा निधी द्यायला या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली.