डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री अर्जेंटिनात पोहोचले, भारतीय समुदायाकडून उत्साहात स्वागत

त्रिनिदाद आणि टोबॅगोचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स इथं पोहोचले. तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. प्रधानमंत्र्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे. 

 

व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि औषधनिर्माण, संरक्षण आणि सुरक्षा, पायाभूत सुविधा, खाणकाम आणि खनिज संपत्ती, कृषी आणि अन्न सुरक्षा, हरित ऊर्जा, आयसीटी आणि डिजिटल नवोन्मेष, आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्परांच्या नागरिकांमधले संबंध या आणि इतर मुद्द्यांवर यावेळी द्विपक्षीय चर्चा होईल. 

 

ग्लोबल साऊथ बरोबर भारताचे संबंध अधिक मजबूत व्हावेत, यासाठी प्रधानमंत्री मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. अर्जेंटिनाच्या भेटीनंतर, ते रिओ दि जानेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझील इथं रवाना होतील. त्यानंतर आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते नामिबिया इथं भेट देतील.